विना शस्त्रक्रिया खुब्याच्या ए व्ही एन चा उपचार

खुब्याचा रक्त प्रवाह का खराब होतो 

साधारणता कोरोना काळानंतर खुब्याचा रक्तप्रवाह अडखळणे या गोष्टी तरुण रुग्णांमध्ये जास्त प्रमाणात वाढलेल आहे यामध्ये रक्ताच्या गुठळी होऊन जो नाजुक रक्त प्रवाह असतो आपल्या खुब्याच्या हाडाचा तो रक्तप्रवाह विस्कळीत होऊन त्या हाडाची झीज होते व ते हाड एक प्रकारे सडायला लागतात. ज्यामुळे रुग्णाला त्रास होतो

खुब्याचा बॉल का खराब होतो ?

आपला खुब्याचा रक्तप्रवाह हा अतिशय नाजूक असतो ज्याच्यामुळे अगदी लहान क्रिया सुद्धा याचा रक्तप्रवाह कमी करू शकते उदाहरणार्थ चालताना हिसका लागणे, पडणे या गोष्टींमुळे अतिरिक्त खुब्यावर ताण येऊन तिथला रक्तप्रवाह हा विस्कळीत होतो ज्यामुळे खुब्याला रक्तप्रवाह भेटत नाही, परिणाम याचा की तेथील हाडाला रक्त प्रवाह न भेटल्यामुळे तेथील हाड हे सडायला/ झिजायला लागतं त्याच्यामुळे रुग्णाला खूप त्रास होतो.

ए व्ही एन ची इतर कारणे

दारूचे भरपूर सेवन केल्यामुळे तसेच तंबाखू भरपूर खाल्ल्यामुळे किंवा धूम्रपान केल्यामुळे तसेच विविध प्रकारच्या गोळ्या जास्त ज्याच्यामध्ये स्टिरॉइड नावाचा घटक असतो ते जास्त काळ घेतल्याने रक्ताच्या गुठळी तयार होतात ज्याच्यामुळे या रक्ताच्या गुठळी नाजूक भागांमध्ये जाऊन आपल्या खुब्याचा रक्तप्रवाह मधे अडकतात .

तसेच वाहनावरून खाली पडणे रोड ट्रॅफिक एक्सीडेंट होणे याच्यामुळे खुब्याचा रक्तप्रवाह खराब होऊन ए व्ही एन होऊ शकतो .

 

रुग्णास होणारे त्रास

यामध्ये रुग्णाला चालताना, वजन देताना, पळताना, दैनंदिन जीवन जगताना खूप वेदना होतात ज्यामुळे रुग्णाची चालण्याची शैली पण बदलते काही काही वेळा त्यांचे दुखणं एवढं असतं की त्यांना रात्री झोपही लागत नाही ,

जास्त काळाचा जो ए व्ही एन असतो त्यामुळे खुब्याची पूर्णपणे झीज होते ज्याच्यामुळे पुढे जाऊन त्या पायाचा आकार हा कमी होतो तर त्याचे स्नायू जे असतात त्या स्नायूचा आकारही कमी होतो.

शस्त्रक्रिये शिवाय ए व्ही एन न वरचे इतर उपाय

यामध्ये प्रामुख्याने गोळ्या औषधे व फिजिओथेरपी याचा विचार केला जातो झीज कमी करण्यासाठी आणि तिथला रक्तप्रवाह वाढवण्यासाठी विविध औषधे असतात जे औषध दिल्यानंतर रुग्णाला चान्सेस असतात की तिथला रक्तप्रवाह पुन्हा सुरळीत होऊन त्याचा आजार हा कमी होऊ शकतो.

कोर डी_कॉम्प्रेशन शस्त्रक्रिया?

यात जी हाडांमध्ये गाठी झालेल्या असतात हाडाला जी सूज आलेली असते ती सूज व त्या गाठी एकदम दोन ते तीन टाक्याच्या शस्त्रक्रियेने तिथला पूर्ण भाग काढला जातो आणि त्या सडलेल्या भागाच्या ऐवजी बोन मॅरो किंवा प्लेटलेट रिच प्लाजमा तिथे टाकले जाते जेणेकरून तिथे नवीन हाड तयार होईल.

Call Now Button