1. गुडघा- गुडघ्याची संरचना
गुडघा आपल्या पायाचा एक महत्त्वाचा सांधा आहे. यात मांडीचे हाड /पायाचे हाड व वाटी असे तीन प्रमुख हाड एकत्र येतात. तसेच दोन गाद्याही असतात- आतील व बाहेरील बाजूस(Medial and Lateral Meniscus).
या गाद्यांमुळे मांडीचे व पायाचे हाड एकमेकांना घासत नाही. तरुणपणात खेळाच्या दुखापतींमध्ये ह्यांना मार लागून गुडघा दुखणे साहजिकच आहे. वाढत्या वयाप्रमाणे त्याची झीज होते, म्हणून म्हातारपणात गुडघेदुखी ही एक सामान्य गोष्ट आहे.
तसेच गुडघ्यामध्ये
- ACL- (Anterior Cruciate Ligament) गुडघ्याच्या समोरील लिगामेंट
- PCL- (Posterior Cruciate Ligament) गुडघ्याच्या मागच्या बाजूची लिगामेंट
हे दोन प्रमुख लिगामेंट्स असतात ज्यामुळे गुडघ्यामध्ये चालताना समतोल साधला जातो.
यांना इजा झाल्यास –
- गुडघा लचकणे
- पायावरील नियंत्रण जाणे
- गुडघा सुजणे
असे त्रास होतात.
2. गुडघ्यामुळे होणारे रुग्णास त्रास
A. वडीलधाऱ्या रुग्णांमध्ये
[यात प्रामुख्याने गादीची झीज होते व हाडे एकमेकांना घासतात ज्यामुळे चालताना /बसताना गुडघेदुखी सतावते.]
- जास्त वेळ चालता न येणे
- मांडी न घालता येणे
- जिना चढता उतरता न येणे
- चालताना गुडघ्यातून आवाज येणे
- गुडघा सुजणे
B. तरुण रुग्णांमध्ये
तरुणांमधील खेळाच्या दुखापती नंतर प्रामुख्याने (ACL/PCL Tear) एसीएल /पीसीएल, गादी फाटणे या समस्या उद्भवतात.
यामुळे होणारे त्रास
- गुडघा लचकणे
- गुडघा सुजणे
- चालताना पाय लचकणे
- पायावरील नियंत्रण जाणे
- पाय ढिल्ला पडणे /लुळा पडणे
- पाय बारीक होणे
असे अनेक लक्षणे जाणवतात
3. गुडघ्याचा त्रास का उद्भवतो
A. वडीलधाऱ्या माणसांमध्ये
जसे जसे वय वाढत जाते तसे तसे शरीराची झीज होत जाते. त्यात प्रामुख्याने गुडघ्याच्या गाद्यांची पण झीज वेगाने होते. साधारणता: भारतीय वयानुसार पन्नाशीनंतर झीज वेगाने होते.
त्यामुळे गुडघ्यातील (मऊपणा) कुशन कमी होते त्यामुळे वरील हाड व पायांचे हाड चालताना /बसताना एकमेकांना घासतात ज्यामुळे गुडघेदुखी वाढते.
हाडे एकमेकांना घासल्यामुळे गुडघ्यातील जे ऑइल असते त्याची गुणवत्ता पण कमी होते या सगळ्यांचा परिणाम होतो ती म्हणजे गुडघेदुखी.
B. तरुण रुग्णांमध्ये
तरुणांमध्ये गुडघेदुखीचे प्रमुख कारण म्हणजे खेळाच्या दुखापती /गुडघ्याला लागलेला मार. यामध्ये एकतर त्यांच्या लिगामेंट जसे की ACL /PCL जे गुडघ्याचा समतोल राखतात चालताना व पळताना त्यांना किंवा गादीला इजा होते.
4. गुडघ्याचा त्रास कसा कमी करावा- झीज कमी करण्याच्या उपाययोजना
प्रथम आहार-
मजबूत हाडांसाठी आहार
तुमचा आहार सगळ्यात महत्त्वाचा आहे, याची बांधणी लहानपणा पासूनच करावी.
सकस आहार घ्यावा जेणेकरून हाडांची ठिसूळता होणार नाही व स्नायूही मजबूत राहतील.
कॅल्शियम /विटामिन डी थ्री युक्त पदार्थ आहारात जास्त घ्यावे जसे कि
- दूध
- चीज
- बदाम
- दही
- कारले /भेंडी
- शेवगा
- सोयाबीन
- मासे /डाळी /कडधान्य
हे आहारात समाविष्ट करावे
दुसरं व्यायाम-
नियमित गुडघ्याचा व्यायाम करणे, जेणेकरून स्नायूंची ताकद टिकून राहते व ऑइल ही सतत गुडघ्यात बनत असते.
तिसरं मालिश-
गुडघ्याची मालिश करणे
चौथं-
गुडघ्यामध्ये ओईल चे इंजेक्शन व औषध घेणे.
5. गुडघेदुखी नंतरच्या योजना
A. वडीलधाऱ्या माणसांमध्ये
- दुखणे कमी करण्यासाठी वेदनाशामक गोळ्या घेणे
- दैनंदिन जीवनात बदल करणे म्हणजे खाली न बसणे/ पाश्चात्य शौचालय वापरणे/ जिना चढ-उतार कमी करणे
- गुडघ्याचा व्यायाम करणे /मालिश करणे
- गुडघ्यामध्ये ऑइलचे इंजेक्शन घेणे
वरील सर्व पर्यायां नंतर शेवटचा पर्याय म्हणजे गुडघाबदलीची शस्त्रक्रिया.
B. तरुण रुग्णांमध्ये
- तरुण रुग्णांमध्ये सूज व दुखणे कमी करण्यासाठी गोळ्या औषध घेणे
- एक्स-रे /एमआरआय काढून हाडाला / लिगामेंटल /गादीला इजा झाली की नाही बघणे.
- रुग्णाला व्यवस्थित तपासणी केल्यानंतर पायाला आधारासाठी (ब्रेस) पट्टा लावणे
- अगदी गरज असेलच तर दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया करणे म्हणजेच की-होल शस्त्रक्रिया किंवा विना टाके शस्त्रक्रिया किंवा लेझर द्वारे शस्त्रक्रिया करणे. (key hole surgery/stitch less surgery/ laser surgery)
6. येथे शस्त्रक्रिया लागत नाही शक्यतो
- आंशिक ACL लिगामेंट तुटणे (Partial ACL Tear)
- आंशिक PCL लिगामेंट तुटणे (Partial PCL Tear)
- गुडघ्यातील आतील गादी मुळापासून फाटली नसेल तर (Medial Meniscus Tear except root)
यांना विना शश्त्रक्रिया उपचार करता येतात
येथे शस्त्रक्रिया करावी लागतेच
- संपूर्ण ACL लिगामेंट तुटणे (Complete ACL Tear)
- संपूर्ण PCL लिगामेंट तुटणे (Complete PCL Tear)
- बकेट हॅन्डल टीयर ऑफ मेनिस्कस (Bucket handle tear of Meniscus)
- मुळापासून गादी फाटली असेल तर (Root Tear)
शेवटी रुग्णाचा त्रास किती आहे यावरच शस्त्रक्रिया अवलंबून असते.
7. गुडघा प्रत्यारोपण शस्त्रक्रिया म्हणजे काय?
साध्या भाषेत म्हणायचे तर नवीन गुडघा लावणे होय, यात खराब झालेले मांडीचे व पायाचे हाड व खराब झालेली गादी की ज्यामुळे रुग्णास त्रास होतो ते सगळे काढण्यात येते आणि, त्या ऐवजी त्याच आकाराचे प्रत्येक रुग्णांनुसार मेटलचे इम्प्लांट टाकले जातात व गादी ही टाकली जाते (High Molecular Weight Polyethylene) जी हाय मॉलेकुलर वेट पॉलीइथिलिन पासून बनवलेली असते.
मांडीचे (Femoral component) आणि पायाच्या (Tibial component) हाडाचे इम्प्लांट व गादी मिळून नवीन गुडघा तयार होतो जो की संवेदना विरहित असतो.
8. गुडघा प्रत्यारोपण शस्त्रक्रिया- गैरसमज
रुग्णाला या शस्त्रक्रियेविषयी गैरसमज असतात जसे की
चालता येईल का ?
बसता येईल का ?
मांडी घालता येईल का ?
…इत्यादी.
शस्त्रक्रियेनंतर त्याच दिवशी रुग्णाला चालता येते, दुसऱ्या दिवशी विना वॉल्कर चालता येते व साधारणता: पाच-सहा दिवसांनी जिना चढता/ उतरता येतो.
आमच्या आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे या सर्व गोष्टी शक्य आहेत. आमच्या चित्रफीत (Video) मध्ये तुम्ही बघू शकता
गुडघेरोपण शस्त्रक्रिया – भीती
काही रुग्णांना अशीही भीती असते की आपण शस्त्रक्रियेनंतर अंथरुणाला खिळून राहू, पण असे अजिबात नाही, ग्रामीण भागात ही भीती जास्त आहे.
ही शस्त्रक्रिया योग्य वेळी, योग्य कारणासाठी, योग्य व्यक्तीकडून झाली असेल तर भीती वाटण्याची काहीही आवश्यकता नाही.
तुम्ही निर्धारस्थपणे ते सर्व काही करू शकता जे तुमची गुडघेदुखी मुळे करायचे थांबले आहे, काही लोक तर वारीलाही जातात, ट्रेकिंग सुद्धा करतात, हे सर्व काही मानसिकतेवर अवलंबून असते.
इम्प्लांटचे आयुष्य हे साधारणतः २० ते ४० वर्ष असते.
संपूर्ण गुडघेरोपण सोडून इतर शस्त्रक्रिया
यात HTO (high tibial osteotomy) ही शस्त्रक्रिया असते यात, गुडघ्यातील वजनाचा बिंदू बदलला जातो. प्रामुख्याने ही शस्त्रक्रिया तेव्हा केली जाते जर आतील भागातिल गुडघा खराब झालेला असेल.
दुर्बिणीद्वारे गादीची तपासणी करून यात जर गादी मुळापासून फाटली असेल तर फक्त गादी रिपेअर करणे, गादीची गुणवत्ता वाढविण्यासाठी इंजेक्शन देणे हे ही इतर पर्याय असतात, ज्याचा रुग्णाला फायदा होतो.
शस्त्रक्रिया कधी करावी?
जेव्हा रुग्णाला …
- एक पाऊलही चालता येत नाही एवढा त्रास होतो
- दैनंदिन जीवनाच्या सर्व गोष्टी दुःखद होतात
- आराम करतानाही सतत गुडघे दुखतात
- जिना चढता येत नाही
- मांडी घालता येत नाही
- शस्त्रक्रिया टाळण्याचे सर्व पर्याय व्यर्थ गेले असतील
तर आणि तरच शस्त्रक्रिया करावी
गुडघा प्रत्यारोपण पारंपारिक आणि रोबोटिक शस्त्रक्रियेतील फरक
या शस्त्रक्रियेमध्ये
- मांडीचे हाडाचा खराब झालेला भाग
- पायाच्या हाडाचा खराब झालेला भाग
- खराब झालेली गादी
हे सर्व काढून त्या ऐवजी नवीन गुडघा टाकला जातो ज्यात मांडीच्या हाडात (Femoral component) व पायाच्या हाडात (Tibial Component) इम्प्लांट टाकले जाते व कृत्रिम गादी जी (High Molecular Weight Polyethylene) हाय मॉलेकुलर वेट पॉलीइथिलिन पासून बनलेली असते ती टाकण्यात येते.
ही शस्त्रक्रिया आधी पारंपारिक म्हणजेच कन्वेंशनल पद्धतीने होत होती आता रोबोटिकणे सुद्धा ती करण्यात येते.
- रोबोटिकमध्ये शस्त्रक्रिये साठी वेळ जास्त लागतो त्यामुळे रुग्णाला भुलीचे औषधही जास्त वेळ द्यावे लागते.
- पारंपारिक शस्त्रक्रिये मध्ये वेळ कमी लागतो कारण सर्जन (Surgeon) स्वतः पटापट निर्णय घेतो व एक ते दीड तासात संपूर्ण शस्त्रक्रिया पार पडते.
- रोबोटिक शस्त्रक्रिये मध्ये दोन ते तीन तास लागतात कारण इथे सर्जन (Surgeon) द्वारे दिलेल्या सूचनांचे रोबोट विश्लेषण(Analysis) करून मग क्रिया करतो.
- ज्यांना पायांना खूप वाक/ बाक आहे, तिथे रोबोटिक च्या साह्याने अचूकता साधता येते पण याचा अर्थ असा नाही की पारंपारिक पद्धतीने ती साधता येत नाही, पारंपारिक शस्त्रक्रिया ही पूर्णपणे सर्जनच्या कौशल्यावर आधारित आहे.
- रोबोटिक ची आजकाल खूप जाहिरात होते याचा अर्थ असा मुळीच नाही की पारंपरिक पद्धत चांगली नाही शस्त्रक्रिया करण्याची यात पद्धत फक्त वेगळी वापरली जाते.
- रोबोटला शेवटी चालवणारा सर्जनच असतो त्यामुळे रुग्णांनी रोबोट कडे न पाहता सर्जन बघावा कारण तुमच्या प्रश्नांची उत्तरेही सर्जनच देतो, ना की रोबोट.
- रोबोटिक शस्त्रक्रियेच्या जाहिराती मध्ये जे दाखवले जाते म्हणजेच कमी वेळ, कमी चिरा, कमी टाके, जलद रिकवरी हे साफ खोटे आहे, असे काहीही होत नाही रिकवरी ही रुग्णावर असते रोबोट वापरणे न वापरणे यावर नाही.