खुब्याची संरचना व खुबा संदर्भात सर्व माहिती

खुब्याची संरचना:-

खुबा हा कमरेखालील एक महत्त्वाचा सांधा आहे.  यात मांडीचे हाड व कमरेतील हाड एकत्र येऊन सांधा तयार होतो.

 

खुब्याचा रक्तप्रवाह :-

खुब्याला प्रामुख्याने मेडियल व लॅटरल सरकम्फ्लेक्स आर्टरीज जी कि फिमोरल आर्टरीच्या ब्रांचेस आहेत, हे रक्तप्रवाह पुरवतात.
हा रक्त प्रवाह नाजूक असतो, जर हा प्रवाह खंडित झाला तर, तेथील सांधा हा झिजायला लागतो.
कार्टिलेज कव्हर हाडावरील नष्ट होते व सांधा खराब होतो ज्यामुळे हालचाल होताना त्रास होतो.

एव्हीएन ( AVN- Avascular Necrosis) म्हणजे काय:-

हा आजार साधारणता कोरोना महामारीनंतर जास्त उद्भवलेला आहे. या आजारात खुब्याचं रक्तप्रवाह बंद होतो व सांधा खराब व्हायला सुरुवात होते.
खुब्याची रक्तसंरचना नाजूक असते त्यामुळे लहान रक्ताची गुठळी सुद्धा खुब्याचा रक्त प्रवाह थांबवू शकते.

एव्हीएन मध्ये फीकॅट अर्लेट ग्रेडिंग नुसार ग्रेड तीन आणि चार मध्ये सर्जरी ही शक्यतो लागतेच व सुरुवातीच्या ग्रेडमध्ये ग्रेड वन आणि टू मध्ये सुरुवातीला विना शस्त्रक्रिया उपचाराही दिला जातो.

खूबेदुखीची इतर कारणे

 

A. खुबा खराब होण्याची कारणे खालील प्रमाणे

  • खुब्याचे हाड तुटणे
  • स्टिरॉइड्स हे औषध दीर्घकाळ घेणे किंव जास्त प्रमाणात घेणे

B. इतर कारणे

  • दारू
  • तंबाखू
  • रक्ताचे आजार
  • इतर

 

खूबेदुखीची ची लक्षणे

  • चालता न येणे
  • चालताना खुब्यात असह्य वेदना होणे
  • पाय खुब्यातून गुडघ्यापर्यंत दुखणे
  • पायावर भार न देता येणे
  • खूप काळ अधिक त्रास सहन केला असेल तर सांध्याची झीज होऊन पाय खालीवर होणे म्हणजे लांबी कमी जास्त होणे, व मांडीच्या मासाचा आकार कमी होणे हि लक्षणे दिसून येतात.
  • मांडी घालता न येणे

 

विना शस्त्रक्रिया उपचार:-

प्रथम तपासणी करून गरज असल्यास एम. आर. आय. व सिटी स्कॅन सांगितला जातो. नंतर सांधा किती झिजला आहे किंवा ए. व्ही. एन. झाला असल्यास त्याचा ग्रेड किती आहे यावर रुग्णाचा उपचार अवलंबून असतो.

आमचा पर्याय विना शस्त्रक्रियेलाच अधिक असतो.

विना शस्त्रक्रिया विविध पर्याय खालील प्रमाणे.

  • गोळ्या औषध घेणे
  • जीवनशैली बदलणे
  • झीज कमी करण्यासाठी विविध औषध उपचार करणे
  • दुखणे कमी करण्यासाठी वेदनाशामक गोळ्या घेणे
  • खुब्यामध्ये इंजेक्शन देणे
  • हाडाची ताकद वाढवण्यासाठी औषध देणे
  • खुब्याचे व्यायाम करणे

इत्यादी उपचार पद्धती यात येतात.

खुबाबदल शस्त्रक्रिया म्हणजे काय (Total Hip Replacement):-

यात प्रामुख्याने खुब्यातील  खराब झालेला सांधा व हाड काढून घेतले जाते व त्याऐवजी नवीन कृत्रिम सांधा त्या जागी टाकला जातो.
कृत्रिम सांध्याची रचना ज्याला आपण प्रोस्थेसिस (Prosthesis) म्हणतो त्याची रचना खालील प्रमाणे असतात.

  • हीप कंपोनंन्ट
  • फिमोरल हेड
  • लाइनर
  • असेटाबुलम कप

अश्या प्रकारे असते.

अशी ही कृत्रिम सांध्याची रचना असते ज्यामुळे रुग्णाचा त्रास हा पूर्ण कमी होतो व तो पुन्हा पूर्वीसारखं जीवन जगू लागतो. या कृत्रिम सांध्याचे आयुष्य साधारणतः 30 ते 40 वर्ष असते पण ते पण कोणत्या प्रकारचा सांधा आहे आणि कोणत्या कंपनीचा आहे त्यावर त्याच आयुष्य अवलंबून असत. कंपनी या दोन प्रकारच्या असतात एक स्वदेशी आणि एक इम्पोर्टेड.

 

कृत्रिम खुब्याचे प्रकार:-

 

एम ओ एम(MOM) Metal On Metal

एम ओ पी (MOP) Metal On Poly

सी ओ पी (COP) Ceramic On Poly

सी ओ सी (COC) Ceramic On Ceramic

शक्यतो सी. . पी.  किंवा सी. . सी. वापरावे ज्याचे आयुष्य जास्त आहे व परिणाम पण छान आहे, ज्यामुळे पेशंटची रिकव्हरी चांगली व लवकर होते आणि पेशंट लवकरच आपल्या आयुष्यात पूर्वपदी येतो.

 

शस्त्रक्रिये विषयी रुग्णास असलेली भीती गैरसमज

  • मांडी घालता येईल का ?
  • जिना चढता येईल का ?
  • पुन्हा पूर्वीसारखं काम करता येईल का ?

वरील सगळ्या प्रश्नांची उत्तरे हो आहे.

रुग्णाचा खुबा किती खराब आहे त्यावर डॉक्टर हे सर्व गोष्टी सांगू शकतील.

 

शस्त्रक्रिये नंतरची रिकवरी:-

  • शस्त्रक्रिये नंतर तुमचे सर्जन तुम्हाला त्याच दिवशी किंवा दुसऱ्या दिवशीही चालवतात.
  • सुरुवातीला वॉकरच्या साहाय्याने चालवले जाते आणि जर काही कॉम्प्लिकेशन झाले नसेल.
  • तर साधारणतः तिसऱ्या दिवशी रुग्ण हा वॉकर सोडून चालू शकतो, पण ते रुग्णाच्या इच्छाशक्तीवर आणि रिकव्हरीवर अवलंबून असते.
  • पाचव्या दिवसानंतर रुग्ण जिना चढू उतरू पण शकतो.

खुब्याच्या स्नायूंचा व्यायाम हा महत्त्वाचा भाग आहे, ज्यामुळे रुग्णाची रिकव्हरी जलद होते आणि आजूबाजूच्या स्नायूंची ताकद वाढते.

 

रिकवरी वेळ:-

रुग्ण शस्त्रक्रिये करता साधारणतः रुग्णालयामध्ये दोन ते चार दिवस असतात. जर काही कॉम्प्लिकेशन झाले नाही तर एक-दोन दिवसात तो वॉकरच्या साहाय्याने चालू लागतो.
पुढच्या चार-पाच दिवसांमध्ये विना वॉकरणे रुग्ण चालू लागतो.
नंतर जिना चढू व उतरू शकतो.
साधारणता दोन ते तीन महिन्यानंतर तो सगळं काही करू शकतो जे शस्त्रक्रियेच्या आधी तो करत होता.

 

खुबा प्रत्यारोपण पारंपारिक आणि रोबोटिक शस्त्रक्रियेतील फरक

या शस्त्रक्रियेमध्ये

  • मांडीचे हाडाचा खराब झालेला भाग
  • कमरेच्या हाडाचा खराब झालेला भाग

हे सर्व काढून त्या ऐवजी नवीन खुबा टाकला जातो ज्यात मांडीच्या हाडात (Femoral Stem) व कमरेच्या हाडात (Cup) इम्प्लांट टाकले जाते.
ही शस्त्रक्रिया आधी पारंपारिक म्हणजेच कन्वेंशनल पद्धतीने होत होती आता रोबोटिकणे सुद्धा पर्याय उपलब्ध आहे.
रोबोटिकमध्ये शस्त्रक्रिये साठी वेळ जास्त लागतो त्यामुळे रुग्णाला भुलीचे औषधही जास्त वेळ द्यावे लागते.

  • पारंपारिक शस्त्रक्रिये मध्ये वेळ कमी लागतो कारण सर्जन (Surgeon) स्वतः पटापट निर्णय घेतो व एक ते दीड तासात संपूर्ण शस्त्रक्रिया पार पडते.
  • रोबोटिक शस्त्रक्रिये मध्ये दोन ते तीन तास लागतात कारण इथे सर्जन (Surgeon) द्वारे दिलेल्या सूचनांचे रोबोट विश्लेषण(Analysis) करून मग क्रिया करतो.
  • रोबोटिक च्या साह्याने शश्त्रक्रिये मध्ये अचूकता साधता येते पण याचा अर्थ असा नाही की पारंपारिक पद्धतीने ती साधता येत नाही, पारंपारिक शस्त्रक्रिया ही पूर्णपणे सर्जनच्या कौशल्यावर आधारित आहे.
  • रोबोटिक ची आजकाल खूप जाहिरात होते याचा अर्थ असा मुळीच नाही की पारंपरिक पद्धत चांगली नाही शस्त्रक्रिया करण्याची यात पद्धत फक्त वेगळी वापरली जाते.
  • रोबोटला शेवटी चालवणारा सर्जनच असतो त्यामुळे रुग्णांनी रोबोट कडे न पाहता सर्जन बघावा कारण तुमच्या प्रश्नांची उत्तरेही सर्जनच देतो, ना की रोबोट.
  • रोबोटिक शस्त्रक्रियेच्या जाहिराती मध्ये जे दाखवले जाते म्हणजेच कमी वेळ, कमी चिरा, कमी टाके, जलद रिकवरी हे साफ खोटे आहे, असे काहीही होत नाही रिकवरी ही रुग्णावर असते रोबोट वापरणे न वापरणे यावर नाही.

 

निष्कर्ष

  1. आमचे प्राधान्य नेहमी विना शाश्त्रक्रिया उपचारालाच असतात.
  2. आमच्याकडे सर्वतोपरी प्रयत्न केले जातील की जेणेकरून रुग्ण त्यांच्या खुबेदुखी पासून मुक्त होईल.
  3. आम्ही कधीही असं सांगत नाही की आम्ही एवढ्या शस्त्रक्रिया केल्या, तेवढ्या शस्त्रक्रिया केल्या, कारण आम्ही त्या शस्त्रक्रिया करण्यापेक्षा शस्त्रक्रिया वाचविण्यात विश्वास ठेवतो.
  4. आम्हाला शस्त्रक्रिया करण्याचा विक्रम करण्यापेक्षा शस्त्रक्रिया न करता रुग्णांना बरं केल्याचा विक्रम केल्याचा अधिक आनंद होईल.
  5. सांधेरोपण शस्त्रक्रिया तेव्हाच करावी जेव्हा इतर उपचार निष्फळ ठरले असतील किंवा सांधा एवढा खराब झालेला असेल की खुब्याच्या हालचाली थांबलेल्या असतील.
  6. या शस्त्रक्रियेचे फायदे खूप आहेत, रुग्णास सर्व गोष्टी वेदनाविरहित करता येतात म्हणजे चालणे/ मांडी घालणे/ जिना चढता उतरता येणे/ खेळणे/ ट्रेकिंग करणे इत्यादी सर्व हालचाली सुरळीत होऊन रुग्णाची जीवनशैली सुधारते व शरीर निरोगी राहते.
Open chat
Scan the code
Hello
Can we help you?
Call Now Button