मी कोणत्याही जेष्ठ नागरिकाला आता बोन डेन्सिटी- हाडांची घनता तपासण्याचा सल्ला देत नाही. कारण वयस्क व्यक्ती निश्चितपणे ऑस्टिओपोरोसिस ग्रस्त असतात. वाढत्या वयानुसार ऑस्टिओ पोरोसिस पातळी निश्चितच आणखी गंभीर बनते. त्यामुळे अस्थिभंग म्हणजेच फ्रॅक्चर होण्याचा धोका वाढत असतो.
यासंबंधी एक सूत्र आहे,
फ्रॅक्चरचा धोका बरोबर = external damage force/bone density (बाह्य धक्क्याची ताकद/हाडांची घनता)
ज्येष्ठ नागरिकांना फ्रॅक्चर होण्याचा धोका वाढतो, कारण हाडांची घनता कमी कमी होत जाते.
त्यामुळे अशा प्रकारचे फ्रॅक्चर टाळण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांनी सर्वात महत्त्वाची काळजी घ्यायला हवी ती आपल्याला अपघात होणार नाही यासाठी विशेष काळजी घेणे.
अपघाती दुखापती टाळण्यासाठी काय केले पाहिजे?
यासाठी मी महत्त्वाच्या सावधानता सर्वांसाठी सुचवत आहे. याचे मुख्य सूत्र एकच — सावध रहा सावध रहा सावध रहा!

पुढील बाबतीत विशेष जागृत रहा!
१. कधीही उंचावरची वस्तू घेण्यासाठी स्टुलावर किंवा खुर्चीवर उभे राहू नका. स्टुल लहान असले तरीही त्यावर उभे राहू नका.
२. पावसाळी दिवसात बाहेर जाण्याचे टाळा.
३. आंघोळ करताना किंवा संडासाचा वापर करताना सावध राहा. आपण घसरणार नाही याची काळजी घ्या.
४. सर्वात महत्त्वाचे विशेषतः स्त्रियांसाठी: बाथरूम मध्ये भिंतीला टेकून किंवा अन्य आधार घेऊन अंतर्वस्त्र घालू नका. स्त्रियांच्या बाबतीत घसरून पडणे आणि कमरेच्या हाडाचे फ्रॅक्चर होण्याची ही मुख्य कारणे आहेत. आंघोळ झाल्यावर तुमच्या खोलीत जाऊन, आरामशीरपणे बेडवर किंवा खुर्चीत बसून कपडेघालणे योग्य.
५. संडासचा वापर करताना बाथरूमची जमीन कोरडी आहे आणि निसरडी नाही याची खात्री करा. केवळ कमोड पद्धतीच्या संडासचा वापर करा. संडास वापरून झाल्यावर उभे राहताना हाताने भक्कम आधार घ्या. अशीच काळजी जमिनीवर बसून आंघोळ करत असाल तरीही घ्या.
६. झोपताना आपल्या गादीच्या आसपास पडलेला पसारा नीट आवरून ठेवा. तसेच आसपासची जमीन ओली असेल तर विशेष काळजी घ्या.
७. रात्री उठावे लागत असेल तर उभे राहण्यापूर्वी प्रथम तीन- चार मिनिटे उठून गादीवरच बसा. त्यानंतरच उभे रहा. तसेच शक्यतो दिवा लावा आणि नंतरच उठा.
८. किमान रात्री आणि खरंतर दिवसा सुद्धा टॉयलेटच्या दरवाजाला आतून कडी लावू नका…. शक्य असेल तर टॉयलेट मध्ये आणीबाणीच्या वेळेस वाजविण्यासाठी इमर्जन्सी बेल अवश्य बसवा. तुम्हाला गरज असेल तेव्हा विना संकोच ही बेल वाजवा आणि घरातील लोकांची मदत घ्या.
९. वयस्कर नागरिकांनी पॅन्ट, पायजमा किंवा तत्सम लांब पायांचे कपडे घालताना खुर्चीत किंवा बेडवर बसून घालावेत.
१०. तुम्ही पडत असल्यास आपले हात आधी जमिनीवर टेकवून आधार घेण्याचा प्रयत्न करा. कमरेच्या हाडाचे किंवा फिमर बोन नेक (मांडीच्या सांध्याच्या हाडाचे) फ्रॅक्चर होण्याचे टाळा. त्या तुलनेत हाताच्या हाडाचे किंवा मनगटाच्या हाडांचे फ्रॅक्चर उपचार सोयीचे आणि सोपे आहेत.
११. तुम्ही चालण्याचा व्यायाम करणे आवश्यक असते. तुम्हाला शक्य असेल तेवढे दररोज जरूर चाला.
१२. विशेषतः स्त्रियांनी घेण्याची काळजी म्हणजे त्यांनी आपले वजन शक्य तेवढ्या सुरक्षित मर्यादेत राहील यासाठी गंभीर प्रयत्न करावेत. आहार नियंत्रण हा सर्वात महत्त्वाचा घटक लक्षात घ्यावा. घरातील उरलेले अन्न खाणे हे स्त्रियांना अनेक वेळा अनिवार्य होते. कृपया असे करू नका. घरातील उरलेले अन्न रस्त्यावर गाई गुरांना द्या. आपले वजन मर्यादित राखणे याचे भान तुमच्या मेंदूत आणि मनात सतत जागृत ठेवा. पूर्ण पोटभर खाण्यापेक्षा पोट निम्मे भरले असताना जेवण थांबवणे केव्हाही चांगले.
१३. हाडांचे वजन वाढविण्यासाठी मी तुम्हाला पूरक अन्न आहाराचा सल्ला देईन. (त्यासाठी दुग्धजन्य पदार्थ, सोया पदार्थ, केळी अशा पदार्थांचा आहारात समावेश करा. त्यातून उत्तम कॅल्शियम पुरवठा होतो.) शक्यतो अशा प्रकारच्या पूरक घटकांसाठी पुरक औषधांचा वापर टाळा.
१४. घराबाहेरील आपला वावर आणि हालचाली अवश्य वाढवा. विशेषतः सूर्यप्रकाशात अधिक वावर ठेवा. सूर्यप्रकाशातील अल्ट्राव्हायोलेट किरणांमुळे त्वचेतील कोलेस्ट्रॉलचे रूपांतर विटामिन डी मध्ये होत असते.

ऑस्टिओपोरो सिस टाळण्यासाठी किंवा लांबविण्यासाठी आतड्यातील कॅल्शियम शोषण आणि ऑस्टिओब्लास्ट ऍक्टिव्हिटी (हाडांच्या पेशींमध्ये होणारी विशेष संश्लेषण प्रक्रिया) अधिक गतिमान करणे, त्याला चालना देणे आवश्यक आहे.
बाथरूमची जमीन घसरण्याला पोषक राहणार नाही अशी असावी. बाथरूम मध्ये चालताना विशेष काळजी घ्या. जिना चढताना कठड्याचा आधार अवश्य घ्या. तोल जाणार नाही आणि पडणार नाही यासाठी विशेष काळजी घ्या.
ज्येष्ठ नागरिकांनी अशा प्रकारे घसरणे किंवा पडणे टाळण्यासाठी सतत जागृत राहणे आवश्यक आहे. एक अपघाती पडणे किंवा घसरणे म्हणजे आयुष्याची दहा वर्षे कमी करणे होय. कारण पडल्यामुळे शरीरातील सर्व हाडे आणि स्नायूंना इजा पोहोचते. म्हणून आवश्यक काळजी घ्या.
दीर्घकाळ उभे राहण्याचे टाळा.
कदाचित हा मेसेज तुम्हाला खूप मोठा वाटेल. परंतु तरीही हा सर्व मेसेज वयस्कर नागरिकांनी आणि वयस्कर नागरिकांची काळजी घेणाऱ्या सर्वांनी वाचणे आवश्यक आहे.

डॉक्टर गणेश आहेर
ऑर्थोपेडिक स्पेशालिस्ट आणि जॉईंट रिप्लेसमेंट स्पेशलिस्ट.
हा संदेश अधिकाधिक ग्रुप वर आणि ज्येष्ठ नागरिकांपर्यंत अवश्य वितरित करा!














