गुडघ्यातील गादी म्हणजे नक्की काय ?
दोन प्रकारच्या गाद्या असतात एक मधल्या बाजूची अनेक बाहेरच्या बाजूची ज्याला आपण साध्या भाषेत मेडियल मेनिस्कस आणि लेटरल मेनिस्कस म्हणतो. गादीचा आकार हा साधारणता गोलाकार किंवा अर्धगोलाकार असतो.
या गादीचे आपल्या गुडघ्यामध्ये नक्कीच स्थान काय?
आपल्या गुडघ्यामध्ये या गाद्या असल्यामुळे आपल्या गुडघ्यातील मांडीचे हाड व पायाचे हाड एकमेकांना घसत नाही या दोघांमध्ये समतोल ठेवायचं काम या आपल्या गाद्या करतात त्याच्यामुळे आपण चालू शकतो , पळू शकतो आणि सगळ्या काही गोष्टी अगदी व्यवस्थित पद्धतीने करू शकतो त्यामुळे त्या व्यवस्थित असने आपल्या गुडघ्यांसाठी खूप महत्त्वाचे आहे.
या गादीची इजा कशी होते ?
साधारणतः याच्यामध्ये जेव्हा रुग्णाच्या गुडघ्याला मार लागतो, किंवा वाहनावरून रुग्ण पडतो, किंवा चालताना कधी कधी पाय निसटतो ,खेळताना पायाला मार लागतो या सर्व गोष्टींमुळे गादीवर अतिरिक्त तान येऊन त्या गादीला तडा जातो आणि गादी तुटते. त्याच्यामुळे रुग्णाला असलेले वेदना होतात.
कधी कधी अगदी नॉर्मल चालताना, पळताना जेव्हा गुडघ्यातील वरच हाड व खालच हाड एकमेकांमध्ये (ट्विस्ट) होतो तेव्हा सुद्धा या दोन्ही हाडांमध्ये गादीला मार लागू शकतो.
जेव्हा गादीला मार लागतो तेव्हा रुग्णातला कोणत्या पद्धतीचा त्रास होतो ?
यामध्ये प्रामुख्याने रुग्णाला चालता येत नाही ,चालता चालता पाय अटकतो ,पायाला सूज येते, तर कधी कधी पायाच्या मागच्या बाजूला ऑइल जमा होऊन एक गाठ बनते ज्याला बेकर्स cyst असे म्हणतात .तसंच पूर्ण वजन देता न येणे, पळताना त्रास होने, आणि दैनंदिन जीवनामध्ये चालताना, बसताना, उठताना गुडघा दुखणे ,गुडघा सुजने ज्याचा एकत्रित परिणाम रुग्णाच्या आयुष्यावर होतो तसंच आजूबाजूच्या स्नायू आणि हाडांवरही होतो.
समजा शस्त्रक्रिया केली नाही तर काय ?
बहुतेक क्षनी गादींच्या इजेमध्ये शस्त्रक्रिया करावी लागत नाही जेव्हा रुग्णाला वरील प्रॉब्लेम असतात त्यामध्ये पण सुरुवातीला गोळ्या औषध आणि फिजिथेरपी चा वापर करून शस्त्रक्रिया टाळण्याचा प्रयत्न केला जातो जेव्हा शस्त्रक्रिया टाळता येत नाही तेव्हा शस्त्रक्रिया केली जाते.
दुर्बिणीची शस्त्रक्रिया म्हणजे नक्की काय?
दुर्बिणीचे शस्त्रक्रिया म्हणजेच लेसर सर्जरी किंवा स्टिचलेस सर्जरी असेही याला म्हणतात किंवा केहोल सर्जरी असेही म्हणतात. यामध्ये कॅमेऱ्याचा वापर करून म्हणजेच दुर्बिणीचा वापर करून गुडघ्याच्या आतील पूर्ण तपासणी केली जाते आणि गादी नक्की कुठे फाटली आहे आणि किती फाटले आहे याची पूर्ण तपासणी केली जाते आणि त्याच्यानंतर विशिष्ट साधनांद्वारे गुडघ्यातील गादि व्यवस्थित पद्धतीने रिपेअर केले जाते.
दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया केल्याने फायदे काय?
याचे फायदे खालील प्रमाणे असतात
यामध्ये अगदी कमीत कमी चिरा पडतो म्हणजे अगदी दोन ते तीन चीरे पडतात ,पेशंट आपल्या दैनंदिन जीवनामध्ये लवकर पुन्हा येतो, रक्तस्राव कमी होतो आणि शरीरावर येणारे व्रण पण कमी असतात. दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया केल्यामुळे पेशंट आपल्या पायावर पुन्हा
चांगल्या पद्धतीने लवकर उभा राहतो आणि टाके नसल्यामुळे रुग्णाला शस्त्रक्रिया विषयी भीती कमी होते.
दुर्बिणीच्या शस्त्रक्रियेमध्ये कोणतेही प्रकारे घाबरण्याची काही आवश्यकता नाही जर गरज असेल तरच शस्त्रक्रिया केली जाते आणि वरील दिलेल्या लक्षणे जर रुग्णाला असतील तर शस्त्रक्रिया रुग्णाला सुचवले जाते. शस्त्रक्रिये नंतर साधारणतः दोन ते तीन आठवडे पेशंटला आराम करायचा असतो ते पण तुमची गादी कोणत्या पद्धतीने फाटली आणि कशी फाटली आहे त्याच्यावर अवलंबून असते त्याच्या नंतर तुम्हाला किती आराम करायचा आहे ते तुमचे शस्त्रक्रिया तज्ञ तुम्हाला सांगतील .
याच्यामध्ये घाबरायचे काही आवश्यकता नाही कारण हे स्टिचलेस शस्त्रक्रिया असते ज्यामध्ये कमीत कमी टाके घेतले जातात ज्यामुळे अजिबात कोणत्या प्रकारचे चिरफाड शरीरामध्ये होत नाही आणि कमीत कमी एक ते दोन टाक्यांमध्ये तुमची शस्त्रक्रिया ही पूर्णपणे व्यवस्थित होते.