आपल्या पायाची संरचना

आपल्या पायामध्ये मुख्यता
घोट्याचा हाड असतं ज्यावर पूर्ण वजन असतं या घोट्याच्या हाडावर मागून घोड शीर नावाची महत्त्वाची शीर त्याला बांधलेली असते ,तसेच घोट्याच्या खालच्या बाजूने प्लांटर फेशिया नावाचा जाड उती असते जी मागच्या हाडापासून पुढच्या पाच बोटांना जोडते ज्याच्यावर पूर्ण वेळ आपलं वजन असत .
जेव्हा माणूस जास्त वेळ उभा असतो किंवा अनवाणी पायांनी चालतो किंवा पायाला जेव्हा मार लागतो तेव्हा या भागाला इजा झाल्यामुळे रुग्णाला सतत वेदना होतात.

टाच दुखी चे मुख्य कारणे
अनवाणी पायाने चालणे, पायाला मार लागणे, जास्त वेळ उभे राहणे ,वजन जास्त असणे, चप्पल किंवा शूज व्यवस्थित न असने ,हाडाला मार लागून हाड वाढणे ,तसेच घोड शिरला मार लागणे ,डायबिटीस सारखे दुसरे काही आजार असणे ,
वरील कारणांमुळे माणसाचे टाच दुखायला लागते.
टाच दुखीचा आजार हा जास्त कोणाला असतो?
तर तो दिवसभर उभा राहणारे लोक, शेतामध्ये अनवाणी पायाने काम करणारे लोक ,ज्यांचे वजन जास्त असतं असले लोक अशा लोकांना टाच दुखी जास्त होते.

टाच दुखी ची लक्षणे खालील प्रमाणे असतात
त्याची तीव्र वेदना होतात मुख्यतः सकाळी उठल्यानंतर जेव्हा पहिल पाऊल टाकलं जातं त्यावेळेस एकदम कडक सणक लागते ,चालताना पाय दुखतो, चालताना जळजळ होते , दीर्घ काळानंतर पायाला सूज वगैरे येते आणि चालताना तसेच रुग्णाला कधी कधी बसल्यावरही दुखायला लागतं .
या सर्व गोष्टींचा परिणाम रुग्णाच्या दैनंदिन कामात होतो त्याच्या हाडाचे,स्नायूंचे नुकसान होते व त्याचे चालण्याची पद्धत बदलते.
आता टाच दुखी चे निदान हे कसे केले जाते ?
यासाठी तुम्हाला तुमच्या जवळच्या ऑर्थोपेडिक सर्जनला भेटावं लागेल त्याच्यानंतर तुमची शारीरिक तपासणी केली जाईल तुमचा एक्स-रे आणि गरज पडली तर इतर तपासण्या ही केल्या जातील.

टाच दुखी नियंत्रित करण्यासाठी घरगुती उपाय
सगळ्यात आधी वजन कमी करणे
नंबर दोन _ज्या तुम्ही दैनंदिन वापरामध्ये चप्पल किंवा शूज वापरता ते एकदम कम्फर्टेबल वापरणे तुमच्या वापरण्यामध्ये कोणत्याही प्रकारे प्लास्टिक किंवा चामड्याची चप्पल वापरली नाही गेली पाहिजे तसेच पायासाठी योग्य तो व्यायाम केला गेला पाहिजे जेणेकरून पायाच्या उती व घोडशीर यांची ताकद वाढेल आणि त्यांची ताकद वाढल्यामुळे हाडावर कमी ताण येईल, मध्ये मध्ये योग्य ती विश्रांती घेणे आणि गरम पाण्याने शेक करणे आणि याही गोष्टी करून टाच दुखी नियंत्रित नाही झाल्यास तुमच्या जवळच्या ऑर्थोपेडिक तज्ञाला भेट देणे.
















