फ्रोझन शोल्डर

फ्रोझन शोल्डर – खांदा जड होण्याचा त्रास समजून घ्या

फ्रोझन शोल्डर म्हणजे काय?

फ्रोझन शोल्डर किंवा ॲडहेसिव्ह कॅप्सुलायटिस (Adhesive Capsulitis) हा एक आजार आहे ज्यामध्ये खांद्याच्या सांध्यामध्ये हालचाल कमी होते, वेदना वाढतात आणि हळूहळू खांदा “गोठल्यासारखा” होतो. त्यामुळे हात उचलणे, कपडे घालणे, केस विंचरणे, वस्तू उचलणे यासारख्या दैनंदिन कामांमध्ये अडचण येते.

लक्षणे (Symptoms)

  1. खांद्यात सतत वेदना राहणे
  2. हात वर किंवा मागे नेण्यात अडचण
  3. रात्रीच्या वेळी वेदना वाढणे
  4. खांद्याची हालचाल मर्यादित होणे
  5. हात जड व कडक वाटणे

कारणे (Causes)

  • फ्रोझन शोल्डरचे नेमके कारण नेहमी स्पष्ट नसते, पण खालील परिस्थितींमध्ये हा त्रास जास्त आढळतो –
  • मधुमेह (Diabetes) असलेले रुग्ण
  • दीर्घकाळ खांद्याचा वापर न करणे (उदा. फ्रॅक्चरनंतर)
  • थायरॉईडचे विकार
  • हृदयविकारानंतरची स्थिती
  • वय ४० वर्षांपेक्षा जास्त असलेले व्यक्ती, विशेषतः स्त्रिया

 

फ्रोझन शोल्डरची टप्पे (Stages)

  1. Freezing Stage (गोठत जाण्याचा टप्पा) – वेदना वाढते, हालचाल कमी होते, हा काळ ४_८ महिन्यांचा असतो.
  2. Frozen Stage (गोठलेला टप्पा) – वेदना थोडी कमी पण हालचाल खूप मर्यादित, हा काळ ४_ ६ महिन्यांचा असतो
  3. Thawing Stage (मोकळा होण्याचा टप्पा) – हळूहळू हालचाल सुधारते, हा काळ ६_९ महिन्यांचा असतो

 

निदान (Diagnosis)

  • डॉक्टरांकडून खांद्याची शारीरिक तपासणी
  • X-ray, MRI किंवा Ultrasound करून इतर कारणे तपासली जातात
  • हालचालींचे मोजमाप करून टप्पा ठरवला जातो

 

उपचार (Treatment)

१. व्यायाम (Physiotherapy)

खांद्याची हालचाल परत मिळवण्यासाठी हे अत्यंत महत्त्वाचे आहे.

उदा. –

  • Pendulum exercise
  • Wall climbing exercise
  • Stretching exercises

 २. औषधोपचार

  • वेदनाशामक व सूज कमी करणारी औषधे
  • कधी कधी Steroid injection दिले जाऊ शकते

३. इतर उपचार

  • Ultrasound therapy, Heat therapy, Hydrodilatation
  • काही जास्त गंभीर प्रकरणांमध्ये दुर्बिणीच्या सहाय्याने किंवा लेसर ने शस्त्रक्रिया केली जाते.
  • (Arthroscopic surgery)

 

घरगुती काळजी (Home Care)

  • गरम पाण्याची पट्टी खांद्यावर दिवसातून २–३ वेळा द्या
  • हलके व्यायाम रोज करा
  • वेदना वाढेल इतके हात जोरात हालवू नका
  • शारीरिक सक्रियता टिकवा

 

फ्रोझन शोल्डर टाळण्यासाठी उपाय

  • दीर्घकाळ खांदा न वापरणे टाळा
  • व्यायाम नियमित करा
  • मधुमेहावर योग्य नियंत्रण ठेवा
  • कोणत्याही खांद्याच्या दुखापतीनंतर फिजिओथेरपी लवकर सुरू करा

 

निष्कर्ष

फ्रोझन शोल्डर हा दीर्घकाळ टिकणारा पण पूर्णपणे बरा होऊ शकणारा आजार आहे. योग्य वेळी निदान, नियमित व्यायाम आणि डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार घेतल्यास खांद्याची हालचाल पुन्हा पूर्ववत होते आणि जीवनमान सुधारते.

Call Now Button