खांदा
खांदा हा शरीराच्या वरील भागातील सर्वात महत्त्वाचा सांधा आहे.
यात प्रामुख्याने Humerus या हाडाचा वरील भाग व scapula या हाडाचा glenoid भाग एकत्रित येऊन हा सांधा बनतो.
या सांध्या भोवती स्नायू असतात, कॅप्सूल असते, बाजूला Labrum असते हे एकत्र येऊन खांद्यातील सांधा तयार होतो.
ज्यामुळे आपण विविध हालचाली करू शकतो.
खांदा दुखीची कारणे
- खांद्याला मार लागणे.
- खेळताना इजा होणे.
- खांदा सटकणे.
- खांदा वारंवार सटकणे.
- मधुमेह होणे (Frozen Shoulder).
खांदा दुखीची लक्षणे
- खांदा दुखणे.
- खांदा सुजणे.
- दैनंदिन हालचाली करताना त्रास होणे.
- शर्ट वगैरे घालतांना किंवा केस विंचरतांना त्रास होणे.
- ठणका मारणे.
- झोप न लागणे.
Frozen Shoulder म्हणजे काय ?
हा आजार साधारणतः मधुमेह असलेल्या व्यक्तींना जास्त प्रमाणात होतो, यात प्रामुख्याने खांद्याच्या हालचाली करणे अशक्य होते किंवा हालचाली करत असताना दुखते. यालाच adhesive Capsulitis असेही म्हंटले जाते.
- यात साध्या भाषेत सांगायच झालं तर खांद्या मध्ये साखर जमा होते त्यामुळे हालचालींचा वेग मंदावतो.
- खांद्यातील जे ऑइल असते त्याची quality पण खराब होते, ज्यामुळे हालचाल करत असताना दुखते.
- या ऑइल ची quantity पण वाढते कधी कधी ज्यामुळे सांधा सुजतो व आग करतो.
- सुरुवातीला हळूहळू दुखणे वाढते, काही न केल्यास एक ते तीन वर्षात आजार अपनेआप नाहीसा होतो.
Frozen Shoulder चे प्रामुख्यानें ३ टप्पे असतात
- Freezing स्टेज- हा काळ २-३ महिने असतो, यात खांद्याची हालचाल करत असतात खांदा दुखतो व हालचाल मर्यादित असते.
- Frozen स्टेज- दुखणे यात थोडे कमी होते पण ताठरता (stiffness) वाढतो. हा काळ ४ ते ८ महिन्यांचा असतो.
- Thawing स्टेज- यात दुखणे व हालचाली सुधारतात. याचा काळ १८ ते २४ महिन्यांचा असतो.
Frozen shoulder होण्याची करणे
कॅप्सूल या आजारामध्ये जाड व tight होतो, ज्यामुळे हालचाली करताना त्रास होतो.
१ मधुमेह (Diabetes).
२ कंपवात (Parkinson Disease).
३ थायरॉईडिसम (Thyroidism) याचे २ प्रकार असतात Hypothyroidism आणि Hyperthyroidism.
४ मेंदूचा झटका किंवा लकवा (Stroke).
या आजारांमध्ये frozen shoulder जास्त होतो.
इतर कारणे
- खांद्याला जर काही मार लागला असेल.
- खांद्यावर शस्त्रक्रिया झाली असेल.
- खांद्याचं फ्रॅक्चर झालं असेल.
- यामुळे सुद्धा Frozen Shoulder होतो कारण वरील स्थितीत मध्ये खांद्याच्या हालचाली खुप वेळ बंद असतात.
उपचार
- यात व्यायाम करणे / गोळ्या औषध घेणे.
- गरज असल्यास ऍनेस्थेसिया अंतर्गत मॅनिपुलेशन (MUGA: Manipulation Under General Anesthesia) किंवा hydrodissection.
- तसेच गरज अगदी असल्यास दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया हि केल्या जातात.
Rotator Cuff ची इजा म्हणजे काय?
Rotator Cuff हा खांद्याचा महत्त्वाचा भाग आहे यात खांद्याच्या आजूबाजूला ४ महत्वाचे स्नायू एकत्र येतात व पिळदार दोरासारखं सारखं रचना तयार करतात, ज्यामुळे आपण खांदा अगदी सहजपणे फिरवू शकतो.
या स्नायूंच्या जखड्याला जो मार लागतो तेव्हा हि इजा होते.
कारणे
- खांद्याला मार लागणे.
- खांदा सटकणे.
- खांद्यावर पडणे.
लक्षणे
- खांद्याच्या हालचाली मंदावणे.
- खांद्याला त्रास होणे.
- दैनंदिन हालचाली करताना खांद्याला त्रास होणे.
- डोक्यावरतून हात घेतांना वेदना होणे.
उपाय
- व्यायाम करणे.
- गोळ्या औषध घेणे.
- गरज असल्यास दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया.
- लघु चिरा देऊन केलेली शस्त्रक्रिया (Mini – open surgery).
यात तुटलेला tendon पुन्हा हाडाला जोडला जातो.
दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया
खांद्यातील बहुतांश शस्त्रक्रिया या दुर्बिनिद्वारे केल्या जातात.
यालाच Laser Surgery , Key Hole Surgery, Stitch Less Surgery असे म्हणतात.
- रोटेटर कफ रिपेअर (Rotator Cuff Repair).
- लॅब्रल टीअर (Labral Tear).
- सिस्ट रिमूवल (Cyst Removal).
- निसटलेल्या खांद्याची शस्त्रक्रिया (Surgeries for shoulder dislocation bankart repair).
या खांद्यातील काही शस्त्रक्रिया दुर्बीणीद्वारे केल्या जाऊ शकतात.
त्याचे फायदे खालील प्रमाणे असतात-
- कमीत कमी टाके (अगदी दोन ते चार).
- लवकर बरे होते (Fast recovery म्हणजे जलद रिकवरी).
- व्रण राहत नाही (नो स्कार मार्क).
- रक्तस्त्राव नाहीच्या बरोबर (रक्तस्त्राव शक्यतो होत नाही, झाल्यास अगदी थोडेसे रक्त येते).
खांदे प्रत्यारोपण शस्त्रक्रिया
जर रुग्णाच्या सांध्यात झीज झाली असेल आणि स्नायू चांगले असतील तर टोटल खांदा बदली (Total Shoulder Replacement) आणि जर रोटेटर कफ स्नायूंची पण बऱ्यापैकी झीज झालेली असेल तर रुग्णास रिव्हर्स खांदा बदली शस्त्रक्रिया (Reverse Shoulder Replacement) लागू शकते.
शस्त्रक्रिया हा पर्याय अंतिम पर्याय असतो जेव्हा विना शाश्त्रक्रिया उपचार संपले असतील.