दुर्बिणीद्वारे एसीएल लिगामेंटची शस्त्रक्रिया आणि त्या विषयी सर्व काही

एसीएल लिगामेंटची रचना

लिगामेंट ही प्रामुख्याने गुडघ्यामध्ये असते आणि ही लिगामेंट मांडीच्या हाडाला व पायाच्या हाडाला जोडत असते. या लिगामेंटची लांबी साधारणता ५० ते ८० mm असते तर रुंदी १० ते १२ mm  असते, तिचा रक्तपुरवठा हा प्रामुख्याने  (मिडल जेनेकुलर आर्टरी) याधमणी पासून येते आणि याचा रक्तपुरवठा मर्यादित असल्यामुळे जेव्हा ही तुटते तेव्हा लिगामेंटचे तुटलेले धागे भरून येत नाही, ज्यामुळे या लिगामेंटची शस्त्रक्रिया करावीच लागते.

या लिगामेंटचे काम काय असतं?

१. चालताना गुडघ्याचा समतोल राखणे २. पायाचे वरील हाड व खालील हाड यांना एकमेकांना व्यवस्थित बांधते, ज्याच्यामुळे गुडघ्याचा चालताना, बसताना, उठताना, पळताना, समतोल राहतो.  एकंदरीत पायाची शक्ती वाढवण्या साठी मदत करते. *जेव्हा हे एसीए लिगामेंट तुटते तेव्हा त्याच्या ऐवजी नवीन लिगामेंट वापरले जाते, त्याचे दोन प्रकार असतात एक ऑटोग्राफ्ट आणि दुसरा ॲलोग्राफ्ट ऑटोग्राफ्ट मध्ये शरीरातील स्वतःच्याच भागाचा वापर करून लिगामेंट बनवले जाते व अॅलोग्राफ्ट मध्ये ते कॅडेव्हरिक (दुसऱ्याच्या शरीराचा भाग) चा वापर केला जातो.

ऑटोग्राफ्ट चे प्रकार

ऍलोग्राफ चे फायदे

A. बोन-पटेलर टेंडन-बोन ग्राफ्ट (Bone Patellar Tendon Graft)- यामध्ये पटेलार टेंडनचा काही भाग लिगामेंट म्हणून वापरला जातो. याचे फायदे असे असतात की हे सगळ्यात स्ट्रॉंग लिगामेंट आहे. याची सगळ्यात जास्त स्थिरता असते आणि जे खेळाडू वगैरे असतात त्याच्यामध्ये हे उपयुक्त ठरतं. यामध्ये रुग्णाचा कोणताच भाग हा लिगामेंट म्हणून वापरला जात नाही त्यामुळे कमी टाके रुग्णाला पडतात, पण याचे काही तोटे सुद्धा आहेत ते तोटे खालील प्रमाणे
B. हॅमस्ट्रिंग ग्राफ्ट (Hamstring Graft) यामध्ये प्रामुख्याने सेमी- टेन्डिनोसस (Semitendinosus) आणि ग्रॅसिलिस (Gracilis) या नावाचे टेंडन वापरले जातात. या लिगामेंटचे फायदे हे पुढील प्रमाणे असतात. यात ऑपरेशन करताना चिरा लहान असतो आणि गुडघा जास्त दुखत नाही. उदाहरणार्थ ग्राफ्ट फेलिअर म्हणजे लिगामेंट फेल होऊ शकते, कारण की त्याला रिजेक्शन येऊ शकतं म्हणजेच दुसऱ्याच्या शरीरातील जो भाग लिगामेंट म्हणून वापरलेला आहे त्यासोबत रुग्णाचे शरीर जुळवून घेत नाही.
C. पेरोनिअस लॉन्गस ग्राफ्ट (Peroneus longus) यामध्ये घोट्याजवळील जी नस असते ती यात लिगामेंट म्हणून वापरली जाते. कॅडेव्हरिक (दुसऱ्याच्या शरीराचा भाग) वापर  केल्यामुळे त्या कॅडेव्हर मध्ये  जर काही आजार असतील तर ते आपल्यामध्ये पण येऊ शकतात आणि जर रुग्णाच्या शरीरानें तो भाग जुळवून घेतला नाही तर त्याचे विपरीत परिणाम सुद्धा होतात.

 

शस्त्रक्रिया नंतर लागणारा बारा होण्याचा कालावधी

शक्यतो पेशंटला लगेच वॉकरच्या साह्याने चालता येते, गुडघा वाकवण्याचा एक विशिष्ट शिष्टाचार असतो जो शस्त्रक्रिया तज्ञ रुग्णाला सांगतो, दैनंदिन जीवनामध्ये पूर्णपणे येण्यासाठी रुग्णाला साधारणता ३ ते ४ आठवडे लागतात आणि खेळायला साधारणतः ३ ते ६ महिने लागतात.

रुग्णाच्या मनात असलेली भीती?

या शस्त्रक्रियेविषयी

१. चालता येईल का ?

२. पुन्हा मला स्पोर्ट्स खेळता येईल का ?

३. मला मांडी घालता येईल का?

४. खूप जास्त फिजिओथेरपी यासाठी करावी लागते का ?

५. रुटीन सुरू व्हायला खूप दिवस लागतात का ?

या शस्त्रक्रियेमध्ये वापरण्यात येणाऱ्या गोष्टी म्हणजेच इम्प्लांट  

यामध्ये जे काही नवीन लिगामेंट तयार केले जाते त्या लिगामेंटला हाडासाठी किंवा हाडा बरोबर बांधण्यासाठी काही विशिष्ट Implant वापर केला जातो ज्याच्यामध्ये आपल्या मांडीच जे हाड असतं तिथं बटन नावाचा प्रकार वापरला जातो तर पायाचे जे हाड असतं तिथं लिगामेंट हाडला बांधण्यासाठी एक तर स्क्रू किंवा बटनचा वापर केला जातो.  या स्क्रूचे पण विविध प्रकार असतात त्याच्यामध्ये जो सगळ्यात जुना प्रकार आहे तो

a. टायटॅनिम (Titanium) या नावाने ओळखला जातो जो की एक्स-रे मध्ये दिसतो त्याच्यानंतरचा जो स्क्रू त्याला

b. पीक स्क्रू (Peek Screw) म्हणतात त्या पिक स्क्रूची खासियत अशी आहे की ती एक्स-रे मध्ये दिसत नाही आणि

c. तिसरा आणि मोस्ट ऍडव्हान्स जो स्क्रू असतो तो असतो बायोअबसॉर्बेबल (bioabsorbable) / बीओडिग्रेडेबल स्क्रू असतो हा जो स्क्रू आहे हा बीटा टीसीपी (Beta  TCP) किंवा पी एल ए (PLA) पासून बनलेला असतो आणि हा साधारणता ४ ते ५ वर्षांमध्ये पूर्णपणे विरघळून जातो.

Call Now Button