खांदे प्रत्यारोपण 

खांदा हा शरीराच्या वरच्या भागात महत्त्वाचा सांधा आहे. या सांध्याभोवती असलेल्या स्नायूंच्या पट्टीला रोटेटर कफ म्हणतात. हा सांधे व्यवस्थित काम करण्यासाठी हे स्नायू आणि हाडे एकत्र काम करतात.

खांदा हा वरील भागातील महत्त्वाचा सांधा आहे. या सांध्याच्या आजूबाजूला जो स्नायूंचा जोडा असतो त्याला रोटेटर कफ (Rotator Cuff) म्हणतात. हे स्नायू व हाड एकत्र काम करून हा सांधा व्यवस्थित पद्धतीने काम करतो.

जर रुग्णाच्या सांध्यात झीज झाली असेल आणि स्नायू चांगले असतील तर टोटल खांदा बदली  (Total Shoulder Replacement) आणि जर रोटेटर कफ स्नायूंची पण बऱ्यापैकी झीज झालेली असेल तर रुग्णास रिव्हर्स खांदा बदली शस्त्रक्रिया (Reverse Shoulder Replacement) लागू शकते.

खांदे दुखीची लक्षणे खालील प्रमाणे-

केस विंचरता न येणे

दैनंदिन कामात खांदा दुखणे

खांदा दुखल्यामुळे कामात अडथळा येणे

शर्टाची बटन लावता न येणे

जड वस्तू उचलता न येणे

हालचाल न केल्यास खांद्याला बरं वाटणे

कारणे

खांद्याचे हाड फ्रॅक्चर झाल्यास

खांद्यातील संधिवात असणे

डायबिटीज मेलिटस असणे म्हणजे मधुमेह

वारंवार खांदा सरकून हाडाची व स्नायूंची गुणवत्ता (क्वालिटी/Quality) खराब होणे

Open chat
Scan the code
Hello
Can we help you?
Call Now Button