हाताचा कोपरा दुखणे / टेनिस एल्बो
हा आजार प्रामुख्याने कोपरा मधील स्नायूंच्या अतिवापरामुळे उद्भवतो
मनगट व हातांच्या वारंवार वापरामुळे
ज्यांना हा आजार आहे किंवा होतो ती बहुतेक लोक टेनिस खेळत नाहीत
या समस्येचा सामान्यतः सामना करणारे सर्वात जास्त व्यवसायिक किंवा व्यवसायात काम करणारे लोक म्हणजे प्लंबर, रंगकाम करणारे, सुतार काम करणारे, खाटीक व साधारण या प्रकारचे व्यवसाय होय
कोपऱ्याच्या बाहेरचा भाग, मनगट व हाताच्या बाहेरचा भाग यात बराच दुखतो
रुग्णास होणारा त्रास
– हाताचे दुखणे
– वस्तू धरता न येणे
– काहीही हाताचे काम करतांना दुखणे
याचे कारण-
वारंवार हाताचा वापर करणे ज्यामुळे हातातील स्नायूंचा अतिवापर होऊन उतीं मधील तंतु तूटतात ज्या उती मनगट आणि हाताला कोपऱ्यापर्यंत जोडलेल्या असतात