संधिवात
सांधेदुखी संधिवात कोणत्याही वयोगटात उद्भवू शकते.
संधिवात (आर्थराइटिस) हा कोणत्याही वयोगटात होऊ शकतो, यात रुग्ण हा सांधेदुखीने त्रस्त असतो.
साधारणत: सकाळी जास्त त्रास होतो असं रुग्ण सांगत असतो आणि दिवस जसा जसा पुढे जाईल तसतसा बरं वाटतं.
हातातील लहान सांधे प्रामुख्याने दुखतात व नंतर मोठे सांधे दुखण्यास सुरुवात होते.
यासाठी संधिवाताच्या रक्ताच्या तपासण्या करून जर रुग्णास संधिवात असल्यास पुढे त्याप्रमाणे औषधे सुरू करण्यात येतात
संधिवाताचे अनेक प्रकार असतात त्यातील काही रक्त तपासनीद्वारे निदान होतात, तसेच बरेचशे संधिवात हे रक्त तपासनी करूनही निदान होत नाही.
गाऊट संधिवात (आर्थराइटिस )
शरीरात यूरिक ॲसिड (Uric Acid) नावाचा घटक जास्त प्रमाणात असल्यास पण संधिवात होतो.
यूरिक ॲसिड हे प्रोटीन (प्रथिन) म्हणजे चिकन, मटण, अंडी, पनीर, डाळ, इत्यादी. जास्त प्रमाणात सेवन केल्यामुळे तयार होणारा घटक असतो.
बहुतांश रुग्णांमध्ये खाण्याचे पथ्य / प्रमाण पाळल्यास संधिवात बरा होतो. अगदी गरज पडल्यास औषधे सुरू करता येतात.