गुडघा सांधे प्रत्यारोपण
प्रत्येक गुडघेदुखीला सांधे रोपनाची गरज नसते.
गुडघ्याची झीज का होते ?
गुडघ्यामध्ये दोन गाद्या असतात, आतील व बाहेरील बाजूस त्यास आयुष्य हे 50 ते 60 वर्ष असते. त्यानंतर त्याची झीज होण्यास सुरुवात होते.
कोणत्याही आयुर्वेदिक पद्धतीने ती गादी पुनर्निर्मित करता येत नाही.
गुडघेदुखी ही समस्या साधारणता उतार वयातच सुरू होते. काही रुग्ण ज्यांना संधिवात आहे, त्यांच्यामध्ये त्रास थोडा लवकर सुरू होतो. रुग्णाचं वय साधारणता वय वर्षे 50 ते 60 नंतर होतो.
संधिवातचे रुग्ण किंवा ज्यांमध्ये तरुणपणी गादी फाटलेली / तरुणपणी ऑपरेट न केलेलं फाटलेल लिगामेंट असेल या रुग्णांना 50 च्या आत गुडघेदुखी सुरू होऊ शकते.
गुडघेदुखी मध्ये रुग्णांना खालील प्रमाणे त्रास होतात –
जास्त वेळ चालता न येणे
जास्त लांब चालता न येणे
चालताना मध्ये मध्ये आराम करणे
मांडी घालताना त्रास होणे
जिना चढणे-उतरण्यास त्रास होणे
गुडघ्यामध्ये आवाज येणे
पाय सरळ ठेवल्यास चांगलं वाटणे
साधारणत: रुग्ण चार पर्याय निवडतात
1. वेदनाशामक गोळ्या घेत राहणे.
2. गुडघ्यामध्ये इंजेक्शन घेणे.
3. तसंच आयुष्य काढणे.
4. गुडघे बदली करून पुन्हा नव्या आयुष्याला सुरुवात करणे.
गुडघे बदली शस्त्रक्रिया – सांधेरोपण नंतर
कोणतेही इंजेक्शन किंवा वेदनाशामक गोळ्या घ्यायची गरज नाही.
रुग्ण पुन्हा त्याच तरुणपणाच्या गोष्टी करण्यास सक्षम होतो.
कृत्रीम गुडघा सांधेरोपन (टोटल नी रिप्लेसमेन्ट)
गुडघा सांधेरोपण ही शस्त्रक्रिया उतारावयातच लागत असते, त्रास रुग्णाला किती होतो यावर उपचार अवलंबून असतो.
वेगवेगळ्या कंपनीजचे वेगवेगळे इंप्लान्ट असतात.
चांगल्या कंपनीचे चांगल्या इम्प्लांटचे आयुष्य हे साधारनता वीस ते चाळीस वर्षे असते.
आंशिक गुडघा बदलणे
(पार्शियल क्नि रिप्लेसमेन्ट)
50 / 60 वर्षे वयाखालील रुग्ण ज्यांच्या फक्त गुडघ्याच्या आतल्या भागात इजा / झिज झालेली असेल अश्या रुग्णांनसाठी आंशिक गुडघा बदलणे हा उपाय एक असतो.
यात पूर्ण गुडघ्या ऐवजी मेडियल कंम्पार्टमेंट बदलेले जाते. यात कमी चिरा आणि फक्त खराब झालेला भागच बदलला जातो.
यात रुग्णाला मेडीयल कंम्पार्टमेंट ऑस्टीओआथ्रायटिस झालेला असतो.
संपूर्ण गुडघा बदलणे
ही शस्त्रक्रिया सामान्यतः वृद्धावस्थेत केली जाते,
या शस्त्रक्रियेसाठी अनेक कंपन्या प्रत्यारोपण देतात.
सामान्यतः प्रत्यारोपण जीवन सरासरी जे साहित्य चांगले दस्तऐवजीकरण आहे सुमारे 20-40 वर्षे आहे
गुडघा / गुडघा संरक्षक शस्त्रक्रिया सुमारे ऑस्टियोटोमीज
या प्रकारच्या शस्त्रक्रियेमध्ये विकृती प्रामुख्याने वरुस प्रकारची असते. ती विकृती ऑस्टियोटॉमी आणि प्लॅटिंगने दुरुस्त केली जाते ज्यामुळे गुडघ्यांना होणारे आणखी नुकसान टाळता येते आणि गुडघा बदलणे टाळता येते. या शस्त्रक्रियांसाठी तुम्हाला तुमच्या सर्जनशी चर्चा करणे आवश्यक आहे