अयोग्य जुडलेल्या हाडांवरील उपचार
आघातानंतर, काही रूग्णांमध्ये विसंगती, नॉन-युनियन उद्भवते ज्यामुळे हाडांचे अयोग्य मिलन आणि संरेखन होते.
अयोग्य जुडलेल्या हाडांच्या शस्त्रक्रिया
काही रुग्णांमध्ये हाडे अयोग्य जोडलेली असतात, ती पुन्हा योग्यरीतीने संरेखना (अलाइनमेंट) करून जोडण्याच्या शस्त्रक्रियाही केल्या जातात, काही रुग्णांना उपचारानंतर किंवा ज्यांनी फ्रॅक्चरसाठी काहीच उपचार नाही घेतलाय त्यामध्ये हाडे तिरपे जुळतात त्यामुळे दिसायला विचित्र व त्या हाडाच्या बाजूचे सांधे हे योग्य रीतीने काम नाही करत.
रुग्णास होणारे त्रास :
सतत ती जागा दुखणे
हात किंवा पाय विचित्र तिरपे दिसणे
व्यवस्थित काम न करता येणे
अशा वेळी रुग्णाची योग्य तपासणी करून त्यांना शस्त्रक्रियेचा सल्ला दिला जातो. यात प्रामुख्याने Ilizarov / Ring fixator यांचा समावेश होतो.